आंबा-काजू बागायतीच्या उत्पन्नातून अभिनेत्यांची गरजूंना मदत

रत्नागिरी : करोनाच्या काळात अभिनेते आणि दिग्दर्शक संचित यादव आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनी रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातील गरजवंतांना मदत केली. त्याचे वैशिष्ट्य असे की, आपल्या आंबा-काजूच्या बागायतींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी ही मदत केली.

Continue reading

कळंबस्ते ग्रामस्थांच्या मदतीला धावले मुंबईकर

रत्नागिरी : कळंबस्ते (ता. संगमेश्वर) येथील मलदेवाडीतील मुंबईकर चाकरमानी ग्रामस्थांच्या मदतीला धावले आहेत. करोनाच्या काळात आवश्यक असलेली विविध उपकरणे आणि साधनांचे त्यांनी घरोघरी वाटप केले.

Continue reading

करोनाबाधितांचे मरण सुसह्य करण्यासाठी पाठविले सरण

रत्नागिरी : वाघ्रट (ता. लांजा) गावचे सुपुत्र, उद्योजक ऋषीनाथ तथा दादा पत्याणे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आज रत्नागिरी पालिकेच्या स्मशानभूमीसाठी २५ टन इतके लाकूड मोफत देण्यात आले. करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची अंत्यसंस्कारावेळी परवड होऊ नये या सामाजिक जाणिवेतून ही लाकडे देण्यात आली.

Continue reading

माचाळच्या शेतकऱ्यांना पावसाळी बीबियाण्यांचे मोफत वाटप

लांजा : माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेने माचाळ गावातील शेतकऱ्यांना पावसाळी भाजीपाल्याचे नऊ प्रकारचे बीबियाणे पुरविले. त्याचे वितरण खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झाले.

Continue reading