महिला दिनानिमित्त `धनलाभ`तर्फे अर्थसाक्षरतेच्या खास सूचना

महिलांमध्ये अर्थसाक्षरता असल्याचे जाणवत नाही. महिलांनी अर्थसाक्षर व्हावे, यासाठी काही प्राथमिक सूचना सावंतवाडीच्या `धनलाभ`तर्फे करण्यात येत आहेत.

Continue reading

ऐका वैज्ञानिकांच्या कथा – शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम आजपासून सुरू करत आहोत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

Continue reading

डाळपस्वारीचे दिवस

आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी दर तीन वर्षांनी येते. यंदाची डाळपस्वारी २५ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२१ या कालावधीत होणार आहे. यंदाच्या डाळपस्वारीवर करोनाचे सावट असले, तरी हा उत्सव नवे चैतन्य देणारा असतो. त्या निमित्ताने, डाळपस्वारी या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाबद्दल ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…

Continue reading

मालवणी अंतरंगाचा साहित्यिक : आ. ना. पेडणेकर

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतून २१ साहित्यिकांची ओळख करून देण्यात आली. त्या लेखमालेचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. त्यापैकी आ. ना. पेडणेकर यांचा आज (२० फेब्रुवारी) जन्मदिन. त्यांच्याविषयी शिवराज सावंत यांनी लिहिलेला हा लेख…

Continue reading

काजव्यांबरोबरच मानवाचे भविष्यही झपाट्याने होत चालले अंधूक

पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत. बच्चे कंपनी काजव्यांच्या मागे पळून दहा-पंधरा मिनिटात शंभरएक काजवे पकडून ते बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ्या खोलीत ठेवत असे. तो एक वेगळाच आनंद असे. अवघ्या २५-३० वर्षांत चित्र पूर्ण पालटले आहे. आज तासभर अंधारात फिरल्यानंतर एखादा काजवा दिसला तर नशीब, असे मानायची वेळ आली आहे. हे काजवे गेले तरी कुठे? त्यांचे भविष्य काय? त्यांचा जीवनक्रम कसा असतो? काजवे काय खातात? ते कसे चमकतात?… पालघर येथील नीता चौरे यांचा लेख…

Continue reading

माधवराव गोखले यांचे निधन

रत्नागिरी : पारावरच्या रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंत रंगभूषाकार आणि नेपथ्यकार म्हणून प्रवास केलेले रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी गणपत ऊर्फ दादा लोगडे (वय ६९) यांचे पाच नोव्हेंबर २०२० रोजी रंगभूमी दिनी रात्री निधन झाले. सोळाव्या राज्य नाट्य स्पर्धेपासून गेल्या वर्षीच्या ५९व्या राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत ते रंगभूमीवर कार्यरत होते.

Continue reading

1 41 42 43 44 45 65