शिक्षण क्षेत्रातील एका बदलाची गोष्ट – नेक्स्ट एज्युथॉन!

दोनशेपेक्षा अधिक व्यक्तींनी केलेली नावनोंदणी, दीडशेपेक्षा अधिक शॉर्टलिस्टेड सहभागी, स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या देशभरातील वीसपेक्षा अधिक संस्था, पंधराहून अधिक चर्चासत्रे, अठरा दिवस, वीसपेक्षा अधिक अध्ययनसत्रे, तज्ज्ञांनी आयोजित केलेली शंभरपेक्षा जास्त सत्रे, अंतिम फेरीत निवड झालेले तीस सहभागी, २९ समस्यांवर प्रश्न मंथनातून निघालेले समाधानकारक उपाय, पाच सजीव कृती आराखडे, अन् शेवटी या सगळ्याचा परिपाक म्हणून झालेली चर्चा… ही होती NEXT EDUTHON.

Continue reading

विकास काटदरे : तळमळीचा कार्यकर्ता, हळवा माणूस

डोंबिवलीचे पत्रकार विकास काटदरे यांच्या निधनामुळे तळमळीचा कार्यकर्ता, हळवा माणूस, प्रचंड दुःख लपवत कायम खळाळत हसणारा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला.

Continue reading

दृष्टी नसली म्हणून काय झालं… तिची जिद्द उत्तुंग आहे!

सुजाता कोंडीकिरे ही तरुणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (पूर्व) शाखेत अधिकारी आहे. तिच्याकडे सध्या स्टेट बँकेच्या व्यवसायवृद्धीची जबाबदारी आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात तिने एसबीआय लाइफचा ५० लाख रुपयांचा, तर २०१९-२० या वर्षात एक कोटी रुपयांचा व्यवसाय करून तिला दिलेले उद्दिष्ट साध्य केलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर तिने अंबरनाथ येथे बँकेचे गृहकर्ज काढून फ्लॅटपण खरेदी केला आहे. हे सर्व वाचून आपल्याला असं वाटेल, की यात काय मोठंसं? किती तरी मुलं-मुली असं सर्व करून दाखवतात. तिने केलं तर काय विशेष? पण सुजाताने जे काही करून दाखवलं आहे, ते विशेषच आहे. कारण तिने तिच्या पूर्ण अंधत्ववर, अंधत्वाने आलेल्या नैराश्यावर मात करत हे यश मिळवलं आहे. तिची कहाणी खूप प्रेरक आहे.

Continue reading

‘योजक’चा ‘योजक’ हरपला; नाना भिडे यांचे निधन

कोकणातील दुर्लक्षित फळांवर संशोधन करून त्यापासून दर्जेदार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या ‘योजक असोसिएट्स’चे संस्थापक कृष्णा पर्शराम तथा नाना भिडे यांचे आज (१६ मे) सकाळी रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कोकणातील फळप्रक्रिया उत्पादनांचे नाव त्यांनी देशातच नव्हे, तर जगाच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवले. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख…

Continue reading

‘… तेच धनंजय कीरांचं खरं स्मारक होईल…!’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वा. सावरकर आदी नेत्यांची चरित्रे लिहिणारे सव्यसाची चरित्रकार आणि रत्नागिरीचे सुपुत्र धनंजय कीर यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने,

Continue reading

1 49 50 51 52