नवी दिल्लीच्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस’ (NBEMS) या संस्थेचा २१वा दीक्षान्त सोहळा २० जून २०२२ रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडला. त्या वेळी रत्नागिरीतील तरुण न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांना ‘डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड’ (Doctorate of National Board – DrNB) या परीक्षेत न्यूरोसर्जरी या विषयात सर्वोत्तम गुण मिळाल्याबद्दल सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले
