मालवण पंचायत समितीने विकसित केले पहिले शैक्षणिक अॅप; ऑफलाइनही उपयुक्त

करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रावरही दुष्परिणाम झाला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर बसले आहेत, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान केले जात आहे, ही नेहमीची प्रक्रिया सुरू व्हायला आणखी किती काळ जाईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे साऱ्यांचेच लक्ष वळले आहे. शिक्षण विभागानेही आता त्याला मान्यता दिली आहे. त्याकरिता शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जण विविध उपक्रम राबवत आहेत. अनेक अॅप्स तयार केली जात आहेत; पण पंचायत समितीने पुढाकार घेऊन अॅप तयार करण्याचा पहिलाच प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समितीने राबविला आहे.

वाचन चालू ठेवा

‘सीए होणे हे वेगळे, मानाचे आणि जबाबदारीचे काम’

रत्नागिरी : ‘ऑडिट करणे हे अर्थकारणातील अत्यंत महत्त्वाचे काम असून, ते केवळ चार्टर्ड अकाउंटंट्सना करता येते. या प्रोफेशनकडे समाजात चांगल्या दृष्टीने पाहिले जाते. तसेच, या क्षेत्रात नैतिक मूल्ये काटेकोरपणे पाळली जातात. त्यामुळेच सीए होणे हे अन्य क्षेत्रांपेक्षा वेगळे, मानाचे आणि तितक्याच जबाबदारीने करण्याचे काम आहे. जास्तीत जास्त नागरिक अर्थविषयक कायद्यांनुसार वागावेत, यासाठी सीए मोठी भूमिका निभावू शकतात,’ असे प्रतिपादन रत्नागिरीतील प्रसिद्ध सीए वैभव देवधर यांनी केले.

कॉमर्स शाखेतील शिक्षण आणि करिअरसंधी; तज्ज्ञांची मोफत ऑनलाइन मुलाखतमाला

रत्नागिरी/पुणे : दहावीनंतर शास्त्र शाखा अर्थात सायन्स साइडला गेल्यावर विपुल संधी उपलब्ध असतात, हे सर्वज्ञात आहे; पण कॉमर्सला गेल्यानंतरही खूप मोठ्या प्रमाणावर करिअरसंधी आता उपलब्ध

सलग नवव्या वर्षी दहावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल

रत्नागिरी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत सलग नवव्या वर्षी कोकण विभागीय मंडळाचा निकाल राज्यात अव्वल ठरला.

शिक्षण क्षेत्रातील एका बदलाची गोष्ट – नेक्स्ट एज्युथॉन!

दोनशेपेक्षा अधिक व्यक्तींनी केलेली नावनोंदणी, दीडशेपेक्षा अधिक शॉर्टलिस्टेड सहभागी, स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या देशभरातील वीसपेक्षा अधिक संस्था, पंधराहून अधिक चर्चासत्रे, अठरा दिवस, वीसपेक्षा अधिक अध्ययनसत्रे, तज्ज्ञांनी आयोजित केलेली शंभरपेक्षा जास्त सत्रे, अंतिम फेरीत निवड झालेले तीस सहभागी, २९ समस्यांवर प्रश्न मंथनातून निघालेले समाधानकारक उपाय, पाच सजीव कृती आराखडे, अन् शेवटी या सगळ्याचा परिपाक म्हणून झालेली चर्चा… ही होती NEXT EDUTHON.