दिशान्तर संस्थेतर्फे ३.३० लाखाच्या श्रमसन्मानाचे वितरण

चिपळूण : शेतीतून महिलांना आर्थिक समृद्धीचा राजमार्ग दाखविणाऱ्या दिशान्तर संस्थेतर्फे ३ लाख ३० हजार रुपयांच्या श्रमसन्मानाचे वितरण करण्यात आले.

Continue reading

मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा

चिपळूण येथील एक मर्चंट नेव्ही अधिकारी अस्लम मालगुंडकर स्वतःच्या नोकरीवर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून करोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ७० करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या जेवणखाण्याची स्वतःच्या घरातून व्यवस्था करून परत सुखरूप घरी सोडण्याचे काम या अधिकाऱ्याने करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

Continue reading

बाटलीवाली!

स्वप्नांचा ऐन उमेदीत चुराडा होतो, तेव्हा मानवी मनाच्या संवेदना मूक होऊन जातात. मनातील साऱ्या इच्छा–आकांक्षा भोवऱ्याच्या वेगाने मेंदूला फिरवत राहतात. मनावर झालेल्या जबरदस्त आघातानंतर मेंदूवरील ताबा निघून गेलेल्या माणसाला आपण मनोरुग्ण असे म्हणतो. पण मनोरुग्ण असूनही कोणाजवळ हात पसरायचा नाही. कष्ट करून स्वतःचे पोट भरायचे, अशा भावना असणे म्हणजे ही बाटलीवाली बाई मनोरुग्ण होण्यापूर्वी संस्कारक्षम जीवन जगली असल्याचा पुरावाच म्हटला पाहिजे. समाजाने मनात आणले, अशा मनोरुग्णांना पुन्हा नक्कीच माणसात आणता येऊ शकेल.

Continue reading

मोफत रिक्षासेवेमुळे लसीकरण झाले सुसह्य

रत्नागिरी : सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन-ऑफलाइन नोंदणी आणि इतर अनेक कारणांमुळे लसीकरण कार्यक्रमाची मोठी चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा अधिक त्रास होत आहे. मात्र रत्नागिरीतील मोफत रिक्षाच्या उपक्रमामुळे अनेकांना लसीकरण सुसह्य झाले आहे.

Continue reading

कोविडयोद्ध्यांच्या मदतीसाठी दुचाकी मेकॅनिक सज्ज

रत्नागिरी : लॉकडाउन काळात कोविड योद्ध्यांची गैरसोय लक्षात घेऊन मॅकेनिक स्किल डेव्हलपमेंट क्लब “हाक तुमची साथ आमची” या ब्रीदवाक्याने कोविड योद्ध्यांना सेवा देण्याच्या हेतूने सरसावला आहे.

Continue reading

अन्नपूर्णा प्रकल्प म्हणजे आनंद आणि समृद्धी

चिपळूण : अन्नपूर्णा प्रकल्प म्हणजे आनंद नि समृद्धीच होय. शेतीतून श्रमसंस्कार, सामाजिक प्रतिष्ठा, अर्थक्रांती घडविणारा ठरला हा प्रकल्प आहे, असे गौरवोद्गार लोटे (ता. चिपळूण) येथील कन्साई-नेरोलॅक पेन्ट्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढले. सविस्तर बातमी सोबतच्या लिंकवर –

Continue reading

1 2 3