पोंभुर्ले (ता. देवगड) : यावर्षीचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पोंभुर्ले (ता. देवगड) : यावर्षीचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.
देवगड : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे येत्या १७ मे रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिसरे मोठे क्षितिज उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे. येत्या ११ ते १३ मे या कालावधीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या डोर्ले (ता. लांजा) येथे हे शिबिर होणार आहे.
रत्नागिरी : सात सामाजिक संस्थांना साठ हजार रुपयांच्या देणग्या देऊन येथील प्रा. उदय बोडस दांपत्याने आपला साठावा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (१२ एप्रिल २०२३) आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी : पुण्यातील विश्व मराठी परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात वेरवली (ता. लांजा) येथे अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या सहयोगाने साहित्य संस्कृती जागर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी हे शिबिर २२ मे ते २६ मे या काळात होणार आहे.