राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.

Continue reading

चिपळूणच्या दिशान्तर संस्थेने बांधला पाच कोटी लिटरचा बंधारा

चिपळूण : येथील दिशान्तर सामाजिक संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून खांदाट (ता. चिपळूण) येथील वैतरणा नदीवर पाच कोटी लिटर क्षमतेच्या सिमेंट काँक्रीट बंधार्‍याची निर्मिती करण्यात आली आहे.

Continue reading

मालवणी म्हणजे मने जोडणारी बोलीभाषा : सुरेश ठाकूर

मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.

Continue reading

बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य देश-विदेशात जावे : भारत सासणे

पोंभुर्ले (ता. देवगड) : ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे संस्मरणीय कार्य माहितीपट, चित्रपट, चरित्र ग्रंथ आदींच्या माध्यमातून देशात, परदेशात जावे, अशी अपेक्षा ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केली.

Continue reading

तळेरे येथील विशाल कडणे दुसऱ्यांदा `भांडुप भूषण`

तळेरे (ता. कणकवली) : समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की समाज आपोआपच आपल्याला गौरवतो. मूळच्या तळेरे (ता. कणकवली) येथील विशाल कडणे या उच्चविद्याविभूषित तरुणाने दुसऱ्यांदा भांडुप भूषणपुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे.

Continue reading

दिशान्तरच्या एकात्मिक शेती कार्यशाळेत महिला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त सहभाग

चिपळूण : एकत्र कुटुंबे विभक्त झाली, ती विभक्तता शेतीत आली. पण नव्या युगाची आधुनिकता शेतीत का अवतरली नाही, हा प्रश्न घेऊन येथील दिशान्तर संस्थेतर्फे आयोजित एकात्मिक शेती कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये संगमेश्वर, चिपळूण, खेडमधील महिला शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.

Continue reading

1 2 3 4 5 144