करोना विषाणूच्या संसर्गाने भीषण रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधत आहेत. भाषणाचा लाइव्ह व्हिडिओ येथे देत आहोत…

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
करोना विषाणूच्या संसर्गाने भीषण रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधत आहेत. भाषणाचा लाइव्ह व्हिडिओ येथे देत आहोत…
कोविड-१९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मार्च २०२०पर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेतील नियम जाणून घ्या…
राज्यात २३ मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या पुरवठा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
करोना संसर्गाशी दोन हात करण्यासाठी राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता; मात्र तरीही लोक रस्त्यांवर येत असल्याने राज्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री
करोनाच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी नागरी (शहरी) भागांसाठी आहे. रत्नागिरीसह खेड, चिपळूण आणि राजापूर, नगरपालिकांचे क्षेत्र, तसेच मंडणगड, दापोली, गुहागर, देवरूख आणि लांजा या नगरपंचायतीच्या क्षेत्रांमध्येही जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या सर्व शहरांमध्ये दुचाकीवरूनही एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. दुचाकीवर दुसरी व्यक्ती दिसली, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला शिक्षा केली जाईल.
‘२२ मार्चच्या मध्यरात्रीपासून राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू झाले आहे. आता प्रत्येकाने स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाला सहकार्य करून कलम १४४ची प्रभावी अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
या कालावधीत काय करावे, काय करू नये, कोणत्या सेवा सुरू, कोणत्या सेवा बंद राहणार आहेत, याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती..