पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांशी संवाद Live

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांशी संवाद, पाहा Live…

Continue reading

कोकणातील हजारो सी-मेन्सना परत आणण्यासाठी भाजप नेते बाळ माने प्रयत्नशील

रत्नागिरी : विविध मालवाहू जहाजांवर काम करणारे कोकणातील अधिकारी, सी-मेन्सना (खलाशी) परत आणण्याकरिता भाजपचे कोकणातील नेते बाळ माने यांनी पुढाकार घेऊन डीजी शिपिंग व केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. कोकणात किमान पाच हजार सी-मेन्स असून, त्यातील बरेच जण नोकरीवर आहेत. हे सारे जण घरी परतावेत, अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. म्हणून माने यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Continue reading

लांज्यातील दोन लहानग्यांना करोना; रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७

आज (ता. ११ मे) सायंकाळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांमध्ये पाच जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४७ झाली आहे. आज निश्चिती झालेल्या रुग्णांमध्ये लांजा तालुक्यातील नऊ आणि १० वर्षांच्या दोघा लहानग्यांचा समावेश आहे. लांजा तालुकाही आता करोनाबाधित तालुक्यांच्या यादीत आल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी आता केवळ राजापूर तालुका करोनामुक्त राहिला आहे.

Continue reading

रत्नागिरीत करोनाचा दुसरा बळी; दापोलीतील महिलेचा मृत्यू

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील एका करोनाबाधित महिलेचा आज (१० मे) रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोना बळींची संख्या दोन झाली आहे. रत्नागिरीतील करोनाबाधितांची आजपर्यंतची संख्या ४२ असून, त्यापैकी पाच जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Continue reading

रत्नागिरीच्या करोना रुग्णांची संख्या ४२वर; आज नवे ८ रुग्ण सापडले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजही (१० मे) आठ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ४२वर गेली आहे. आज संगमेश्वर येथील चार

Continue reading

1 322 323 324 325 326 342