फेसबुक लाइव्हद्वारे प्रोग्रामिंगचे क्लास; रत्नागिरीतील अभय भावेंचा उपक्रम

करोना संसर्गाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू झाले. त्यामुळे, अत्यावश्यक सेवेत नसलेल्या आणि वर्क फ्रॉम होम करू शकत नसलेल्या नागरिकांना हाताशी बराच मोकळा वेळ उपलब्ध झाला. अचानक

गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी ‘सॅनिटायझर टनेल’ बसवणार

करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यात रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय, विद्यापीठे, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलची उभारणी केली जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने पुढाकार घेऊन कमी खर्चात सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. काही राज्यांत त्याचा वापर आधीच सुरू झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

लॉकडाउनमध्ये शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे; रत्नागिरीतील तरुण प्राध्यापकाचा उपक्रम

पुण्यात कार्यरत असलेल्या आणि मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या शौनक माईणकर या तरुण प्राध्यापकाने लॉकडाउनच्या काळात शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्टॉक टॉक असे या कोर्सचे नाव. शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करू इच्छिणारी कोणीही व्यक्ती या कोर्समध्ये सहभागी होऊ शकते.

दिवा का लावायचा? आयुर्वेदातील विज्ञान काय सांगते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिलला नऊ वाजता दीपप्रज्ज्वलन करायला सांगितले आहे, त्यावर अनेकांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय असावा, याविषयी जाणून घेण्यासाठी *लांजा येथील चैतन्य घाटे या BAMSच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने* मुंबईतील *वैद्य अरुण मिश्रा* यांच्याशी संपर्क साधला. आयुर्वेदातील व्याधीविचार किती व्यापक असतो आणि त्यावर असे उपाय कशा प्रकारे कार्य करू शकतात, याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

साप्ताहिक कोकण मीडिया – ३ एप्रिलचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे तीन एप्रिल २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत

आमच्या परगण्यात आम्हीच शासन

दोन-दोन परगण्यांची जहागिरी सांभाळणे तसे काही सोपे नाही. आम्ही शासन आहोत हे पदोपदी सांगावे लागते, पण सांगण्यापेक्षा कृतीवर आमचा भर अधिक आहे. त्यामुळे राज्याचे सारे सैनिक आपापल्या ठिकाणी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत का, याची पाहणी आम्हाला अधूनमधून करावी लागते. कधी आम्हाला बहिर्जी नाईक यांची आठवण होते, तर कधी शिवप्रभूंची. पण आठवणीत रममाण होण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करतो.

1 61 62 63 64 65 72