करोनाच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी नागरी (शहरी) भागांसाठी आहे. रत्नागिरीसह खेड, चिपळूण आणि राजापूर, नगरपालिकांचे क्षेत्र, तसेच मंडणगड, दापोली, गुहागर, देवरूख आणि लांजा या नगरपंचायतीच्या क्षेत्रांमध्येही जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या सर्व शहरांमध्ये दुचाकीवरूनही एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. दुचाकीवर दुसरी व्यक्ती दिसली, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला शिक्षा केली जाईल.
