शिवसेनेच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा पहिलावहिला राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. साप्ताहिक कोकण मीडियाच्या १३ मार्च २०२०च्या अंकाचा हा अग्रलेख…

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
शिवसेनेच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा पहिलावहिला राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. साप्ताहिक कोकण मीडियाच्या १३ मार्च २०२०च्या अंकाचा हा अग्रलेख…
करोना विषाणूच्या फैलावामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींचे देशाला उद्देशून भाषण – पाहा लाइव्ह व्हिडिओ
(१९ मार्च २०२० – रात्री आठ वाजता.. )
रत्नागिरी : गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा गावकर यांनी सादर केलेल्या शास्त्रीय, तसेच अभंग, नाट्यगीत गायनाने रत्नागिरीकरांना मंत्रमुग्ध केले. रत्नागिरीतील ‘खल्वायन’ या संस्थेची सलग २६९वी मासिक संगीत सभा १४ मार्च २०२० रोजी सायंकाळी झाली. ती सभा मुग्धा गावकरांच्या सुमधुर गायनाने रंगली.
करोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र काळजी करण्यापेक्षा नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय राबवून काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत ठाण्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश भागवत यांनी दिलेल्या माहितीचा ऑडिओ सोबत देत आहोत.
महात्मा गांधींनी पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात रत्नागिरीतील आशाताई पाथरे सहभागी झाल्या होत्या. १५ मार्च २०२० रोजी त्या शंभरीत पदार्पण करत आहेत. विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या आशाताईंना कारावास भोगावा लागला. त्या वेळच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. शंभरीत पदार्पण करणाऱ्या आशाताईंशी, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांनी साधलेला संवाद महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे.
रत्नागिरी : ‘महिला दिन केवळ आठ मार्चला नव्हे, तर वर्षाचे सर्व दिवस साजरा करायचा असतो. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करत असलो, तरी प्रत्यक्षात आपण त्याविरोधात वागतो.