संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात आणि अगदी ग्रामीण पातळीवरही प्रत्येक जण आपापल्या परीने हे प्रयत्न

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात आणि अगदी ग्रामीण पातळीवरही प्रत्येक जण आपापल्या परीने हे प्रयत्न
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे; मात्र या कालावधीत खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरू ठेवावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी करण्यात आली आहे.
रत्नागिरी : मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
रत्नागिरी : सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध करून देताना व्यापाऱ्यांकडून साठेबाजी, तसेच काळा बाजार झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये, जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे उपलब्ध होणार आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
रत्नागिरी : आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून २४ मार्च २०२० रोजी नेहमीचे कार्यक्रम प्रसारित झाले नाहीत. करोना आजाराच्या प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याकरिता शक्य असेल तेथे शासकीय आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रातही मोजकेच कर्मचारी होते आणि स्थानिक कार्यक्रमांचे प्रसारण नेहमीप्रमाणे होऊ शकले नाही. त्यामुळे आकाशवाणीच्या नियमित श्रोत्यांना नेहमीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला नाही. हीच स्थिती आणखी काही दिवस राहणार आहे.
रत्नागिरी : करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू मिळणाऱ्या दुकानात गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ग्राहकांना त्या वस्तू घरपोच देण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.