मुंबई : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
