मंडणगड : आंबडवे (मंडणगड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने साजरी केली जाणारी जयंती पुढच्या वर्षापासून राज्य शासनाच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
