रायपाटणच्या शेतकरी समूहाचा एक हजार डझन हापूस आंबा एसटीतून औरंगाबादला

राजापूर : एसटीने आंब्याची वाहतूक सुरू केल्याचा फायदा रायपाटण (ता. राजापूर) येथील शेतकरी समूहाला झाला. मालवाहतुकीच्या एकाच ट्रकमधून साडेतीन टन म्हणजे एक हजार डझन हापूस आंबा सोमवारी (ता. २५ मे) थेट औरंगाबादला रवाना झाला.

Continue reading

एसटीने कोकणातून मुंबई-पुण्यासह राज्यभरात पाठवता येतील आंबे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरीवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे.

Continue reading