सावंतवाडी तालुक्यात क्वारंटाइन तरुणाचा मृत्यू; कारण अस्पष्ट

सावंतवाडी : क्वारंटाइन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. मुंबईतील मालाडहून कालच (२६ मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वारंटाइन होता. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Continue reading

रत्नागिरीची रुग्णसंख्या १८३वर; नवे आठ करोनाबाधित सापडले

रत्नागिरी : काल रात्री (२६ मे) उशिरा आलेल्या अहवालांनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी आठ करोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १८३वर पोहोचली आहे. या आठपैकी सहा जण रत्नागिरीतील, तर दोन जण संगमेश्वरातील आहेत. रत्नागिरीतील सहा जणांपैकी चार जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत.

Continue reading

देवरूखच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले किफायतशीर, सुखकर फेस शील्ड

देवरूख : करोना संसर्गप्रतिबंधक फेस शील्ड तयार करून देवरूख आणि परिसरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या सुटीचा सदुपयोग केला आहे. करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रचलित फेस शील्डमध्ये असलेले दोष दूर करून त्यांनी हे फेस शील्ड तयार केले आहे. शिवाय ते किफायतशीर किमतीत उपलब्ध करून दिले आहे.

Continue reading

रत्नागिरीत स्वॅब टेस्ट लॅब उभारण्याचा शासन निर्णय जारी; करोनाग्रस्तांमध्ये आज पाचने वाढ

रत्नागिरी : मिरज येथून आज (२५ मे) रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६१वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५५ रुग्णांना उपचारांनंतर पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करायला मान्यता देणारा शासन निर्णय राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज (२५ मे) जारी केला.

Continue reading

करोनाच्या पार्श्वभूमीवर भातशेती; सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना ध्वनिचर्चासत्रातून मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सध्या करोनाच्या संसर्गाचे संकट मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे; मात्र खरीप हंगाम जवळ येत असल्याने कोकणाच्या शेतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या भाताच्या लागवडीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरीप भात लागवडीचे नियोजन, तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शेती करताना घायची काळजी याविषयी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना नुकतेच ध्वनिचर्चासत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.

Continue reading

दिवसभरात रत्नागिरीत २४ आणि सिंधुदुर्गात एका रुग्णाची वाढ; रत्नागिरीची रुग्णसंख्या १५६

रत्नागिरी : आज (२४ मे) सायंकाळी मिरजमधून प्राप्त झालेल्या २७ अहवालांपैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १५१वर पोहोचली आहे. आज (२४ मे) सकाळीच १३ रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत आज १९ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज एक नवा करोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

Continue reading

1 26 27 28 29 30 35