पावसाळ्यात कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ पाडतो. पावसाच्या सरींनी सर्वत्र उगवणारे हिरवे अंकुर आणि शेतीच्या कामात मग्न असणारे शेतकरी कुटुंब असे सारे दृश्य नजरेचे पारणे फेडणारे असते. लॉकडाउनच्या काळात कोकणचा हा निसर्ग कलाशिक्षक विष्णू गोविंद परीट यांनी आपल्या कुंचल्यातून बहारदारपणे कागदावर उमटवलाय. परीट यांची चित्रे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.
