‘कृषी कायदे पूर्ण विचारांती, संसदेत चर्चा करूनच आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आणले होते; त्यांचं देशातल्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी स्वागतही केलं; मात्र बरेच प्रयत्न करूनही शेतकऱ्यांच्या काही गटांना ते पटलेच नाहीत. त्यामुळे कदाचित आमच्या तपस्येतच काही त्रुटी राहिली असावी, ज्यामुळे आम्ही सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य असूनही त्या शेतकऱ्यांना पटवू शकलो नाही. म्हणून आम्ही हे तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत,’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ नोव्हेंबर) गुरुनानक जयंतीचं औचित्य साधून केली.
