रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.
रत्नागिरी : आद्य शंकराचार्यविरचित शिवपंचाक्षर स्तोत्र, नर्मदाष्टक, जागन्नाथाष्टक, भवान्याष्टक, कृष्णाष्टक आणि देव्यापराधक्षमापन स्तोत्र सादर करत आद्य शंकराचार्यांचा जीवनक्रम उलगडणारा सुरेल कार्यक्रम चिपळूणच्या कात्यायनी स्तोत्र पठण मंडळाने सादर केला.
चिपळूण : येथील दिशान्तर सामाजिक संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून खांदाट (ता. चिपळूण) येथील वैतरणा नदीवर पाच कोटी लिटर क्षमतेच्या सिमेंट काँक्रीट बंधार्याची निर्मिती करण्यात आली आहे.
रत्नागिरी : दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत आयुष शिर्के आणि अवनी आशिष घाणेकर यांनी सोडतीतून सायकली जिंकल्या. याशिवाय विजेत्या स्पर्धकांना १० सायकल हेल्मेट आणि इतर अनेक बक्षिसे सोडतीतून वाटण्यात आली.
मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या रविवारी (दि. २२ मे) सकाळी ६ वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे शहरांतर्गत सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.