चिपळूण : शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे चिपळूणचे सुपुत्र सिद्धहस्त बालसाहित्यकार कै. श्रीकांत गोवंडे सर यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे चिपळूणचे सुपुत्र सिद्धहस्त बालसाहित्यकार कै. श्रीकांत गोवंडे सर यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी (१० नोव्हेंबर २०२३) धन्वंतरीपूजन करून रत्नागिरीत राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेद व्यासपीठ आणि निमा या संस्थांच्या रत्नागिरी शाखा, तसेच रत्नागिरी डॉक्टर्स असोसिएशनने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
रत्नागिरी : खल्वायनच्या दिवाळी पाडवा संगीत सभेत पुण्याच्या सौ. मंजिरी कर्वे–आलेगावकर यांचे गायन येत्या मंगळवारी होणार आहे.
‘आठवणीतलं कोकण’ या विशेषांकाबरोबरच ‘कोकण मीडिया’ने आठव्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोकण मीडिया’चा हा आठवा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. त्याचे कारण म्हणजे कोकणवासीयांनी जपलेल्या कोकणाविषयीच्या आठवणी त्या निमित्ताने संकलित करता आल्या. कोकणाविषयीची ही माहिती लिहिणारे स्मृतिवाहक, ती माहिती संकलित करून अंक प्रकाशित करण्यासाठी साह्यभूत ठरलेले जाहिरातदार, माहिती वाचणारे वाचक, अंकाचे वितरक या सान्यासह सर्वांनाच दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
रत्नागिरी : येत्या १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात ययेणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात श्रोत्यांना अयोध्याधीश प्रभू श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र अनुभवायला मिळणार आहे.
मुंबई : वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दिवाळी अंक हा मराठी भाषेचा, परंपरेचा ठेवा संस्थेच्या वतीने बृहन्महाराष्ट्रात इंदूर येथे आणि परदेशात अमेरिकेत लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविला जाणार आहे.