कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निष्क्रियतेबाबत यापूर्वी या सदरात यापूर्वी अनेक वेळा मुद्दे मांडले होते. यावेळी मात्र एक सकारात्मक मुद्दा मांडण्याची संधी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेने दिली आहे. गेली काही वर्षे सूप्तावस्थेत असलेल्या या शाखेचे अलीकडेच पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शाखेतर्फे विविध संकल्प जाहीर करण्यात आले आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प त्यामध्ये आहे.
