९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत होत आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्या रूपाने यंदा प्रथमच एक वैज्ञानिक साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले; मात्र प्रकृती अस्वास्थामुळे डॉ. नारळीकर या संमेलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप तीन डिसेंबर रोजी संमेलनस्थळी प्रसारित करण्यात आली. त्यांचे हे भाषण आपल्याला येथे वाचता येईल. भाषणाच्या शेवटी दिलेल्या लिंकवरून आपण हे भाषण डॉ. नारळीकर यांच्याच आवाजात ऐकूही शकता.
