मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसाराचे काम करणाऱ्या मोडी लिपी मित्र मंडळाच्या ‘मोडीदर्पण’ या चौदाव्या दिवाळी अंकाचे पवई येथे थाटात प्रकाशन झाले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसाराचे काम करणाऱ्या मोडी लिपी मित्र मंडळाच्या ‘मोडीदर्पण’ या चौदाव्या दिवाळी अंकाचे पवई येथे थाटात प्रकाशन झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव हे आता दत्तस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. श्री टेंब्ये स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तमंदिराविषयीचा हा लेख……..
‘झोंपाळ्यावरची गीता’ या मराठी ओवीरूप पुस्तकाच्या राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे गीता जयंतीच्या औचित्याने तीन डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत प्रकाशन झाले. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, व्याख्याते-प्रवचनकार धनंजय चितळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रत्नागिरी : येत्या शनिवारी, तीन डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीत The Geeta in Leisure या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन होणार आहे. १९१७ साली कवी अनंततनय यांनी लिहिलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. तसेच, साप्ताहिक कोकण मीडियाने २०२२च्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर घेतलेल्या लेख आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही या वेळी होणार आहे.
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या शिपोशी गावात हरिहरेश्वर देवस्थानातील कार्तिकोत्सव १०० वर्षांपूर्वीपासून परंपरेने चालत आलेला आहे. त्या उत्सवाच्या अनुषंगाने एकंदरीत कोकणी माणसाच्या उत्सवप्रियतेबद्दल चिंतन करणारा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सौ. मनीषा आठल्ये यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या केळवली गावात श्री नृसिंह जयंतीचा उत्सव होतो. त्या उत्सवाबद्दलचा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात श्रीप्रकाश सप्रे यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.