‘एनटीए’मार्फत या वर्षी (२०२२) घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. त्रि. प. केळकर कनिष्ठ महाविद्यालयातील (द्वारा फाटक हायस्कूल) विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादित केले आहे

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
‘एनटीए’मार्फत या वर्षी (२०२२) घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. त्रि. प. केळकर कनिष्ठ महाविद्यालयातील (द्वारा फाटक हायस्कूल) विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादित केले आहे
रत्नागिरीच्या दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ एक मार्च २०२१ रोजी झाला.
रत्नागिरी : फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी, शिक्षक, उपमुख्याध्यापक आणि निवृत्तीनंतरही गुरुवर्य एमएन तथा माधव नरहर जोशी यांनी शाळेसाठी आयुष्यभर योगदान केले. गुरुवर्य फाटक यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी सुरू केलेले फाटक हायस्कूल शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. आता संस्थेने भारतीय संस्कृतीच्या विचारावर आधारित इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली असून, गुरुवर्य जोशी या योग्य व्यक्तीचे नाव शाळेला दिल्याचा विशेष आनंद वाटतो, असे प्रतिपादन दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर यांनी केले.
रत्नागिरी : सांगली शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या गुणवत्ता शोध परीक्षेत रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.