दापोली नगर पंचायतीत शून्य खर्चात निर्जंतुकीकरण कक्ष

दापोली : जुन्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून दापोली नगर पंचायतीने शून्य खर्चात तयार केलेल्या स्वयंचलित निर्जंतुकीकरण कक्षाचे उद्घाटन आज (ता. १३ एप्रिल) झाले. करोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून नगर पंचायत कार्यालयात या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस हजार रुपयांची बचत झाली आहे.

Continue reading

गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी ‘सॅनिटायझर टनेल’ बसवणार

करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यात रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय, विद्यापीठे, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलची उभारणी केली जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने पुढाकार घेऊन कमी खर्चात सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. काही राज्यांत त्याचा वापर आधीच सुरू झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

Continue reading