रत्नागिरी : विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील बालरंगभूमीने आयोजित केलेल्या कला शिबिरात सहभागी झालेल्या मुलांनी गणपतीच्या मातीच्या मूर्ती साकारून गणेशोत्सवाचा आनंद आगळ्या पद्धतीने साजरा केला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील बालरंगभूमीने आयोजित केलेल्या कला शिबिरात सहभागी झालेल्या मुलांनी गणपतीच्या मातीच्या मूर्ती साकारून गणेशोत्सवाचा आनंद आगळ्या पद्धतीने साजरा केला.
रत्नागिरी : करोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन यांमुळे सगळ्याच गोष्टींवर विपरीत परिणाम झाले आहेत. प्रचंड ऊर्जा ज्यांच्यात सळसळत असते, अशी लहान मुलेही या लॉकडाउनमुळे घरातच कोंडली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बाल-नाट्य कार्यशाळेमुळे त्यांच्या ऊर्जेला व्यक्त होण्यासाठी चांगले माध्यम उपलब्ध झाले. बालरंगभूमी परिषदेची रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
रत्नागिरी : उद्याचे निपुण अभिनेते घडविण्याची ताकद बालरंगभूमीमध्ये असते आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. सध्या लॉकडाउनमुळे बाहेर फिरण्यावर निर्बंध आलेले असतानाही या प्रक्रियेत खंड पडू नये, म्हणून ऑनलाइन बाल नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषदेची रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या ऑनलाइन बाल-नाट्यकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मोठ्या गटात बेळगावच्या सोहम संदीप शहापूरकरचा, तर लहान गटात ठाण्याच्या अस्मि अजित पाटीलचा प्रथम क्रमांक आला आहे. लॉकडाउनच्या काळात घरात असलेल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर निकाल वाचा आणि विजेत्यांचे व्हिडिओ पाहा…
रत्नागिरी : रत्नागिरीच्या बालरंगभूमी परिषदेने ऑनलाइन बाल-नाट्यकला स्पर्धा आयोजित केली आहे. लॉकडाउनच्या काळात घरात असलेल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मुलांनी पाच ते सात मिनिटांच्या एकपात्री सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवायचे आहेत. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत पाच जून २०२० आहे.