रत्नागिरी : उद्याचे निपुण अभिनेते घडविण्याची ताकद बालरंगभूमीमध्ये असते आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. सध्या लॉकडाउनमुळे बाहेर फिरण्यावर निर्बंध आलेले असतानाही या प्रक्रियेत खंड पडू नये, म्हणून ऑनलाइन बाल नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषदेची रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
