मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा

चिपळूण येथील एक मर्चंट नेव्ही अधिकारी अस्लम मालगुंडकर स्वतःच्या नोकरीवर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून करोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ७० करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या जेवणखाण्याची स्वतःच्या घरातून व्यवस्था करून परत सुखरूप घरी सोडण्याचे काम या अधिकाऱ्याने करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

Continue reading