बेरोजगार मनुष्यबळ आणि मनुष्यबळाची आवश्यकता असलेले उद्योग यांचा समन्वय महाजॉब्ज संकेतस्थळाने साधला आहे. पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर सुमारे ९० हजार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली, तर कामगारांची गरज असलेल्या साडेसातशे कंपन्याही नोंदविल्या गेल्या. या संधीचा उपयोग कोण कसा करून घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोकणातील कोणीही संकेतस्थळाचा उपयोग करून घेतला गेला नसल्याचे दिसते.
