रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या रत्नागिरी विभागाने नाताळच्या, तसेच शनिवार-रविवारला जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात टूर पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार पुढील मार्गांवर एसटी बस सेवा देण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
