मुंबई : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पर्यटन उद्योगाला असलेला वाव लक्षात घेता या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी इंटर्नशिपचा हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. इच्छुकांनी येत्या २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत.
