भीक मागून एसटीची स्वच्छता

सर्वसामान्य प्रवासी पुन्हा एकदा एसटीकडे वळावेत, या उद्देशाने दोन कोटी रुपयांची बक्षीस योजना एसटीने जाहीर केली आहे. पण ती करतानाही शासनाकडून किंवा तोट्यातील एसटी महामंडळाकडून कोणतीच आर्थिक तरतूद केली जाणार नाही. देणगीदार, उद्योजक, सामाजिक संस्थांकडून पैसे उपलब्ध करून घेऊन एसटी बस, उपाहारगृहे, बसस्थानके आणि परिसर स्वच्छ, सुंदर केला जावा, अशी ही योजना आहे. त्यातून निवड होणाऱ्या बसस्थानकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. थोडक्यात म्हणजे कर्मचाऱ्यांनी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करून हे सौंदर्यीकरण करायचे आहे.

Continue reading