लांजा : ओव्यांच्या साथीने जात्यावर दळण दळले जात होते आणि त्यातून जणू गोमंतकीय कवितांचे पीठ पडत होते. जोडीला नैसर्गिक पाऊसही अधूनमधून बरसत होता. या अनोख्या समारोहात लांज्याचे रसिक न्हाऊन निघाले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लांजा : ओव्यांच्या साथीने जात्यावर दळण दळले जात होते आणि त्यातून जणू गोमंतकीय कवितांचे पीठ पडत होते. जोडीला नैसर्गिक पाऊसही अधूनमधून बरसत होता. या अनोख्या समारोहात लांज्याचे रसिक न्हाऊन निघाले.
लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांजा शाखा आणि लोकमान्य वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. १५ जुलै) रोजी लांजा येथे गोमंतकीय कवींचा ‘गंध मातीचा…छंद कवितेचा’ या कविता आणि लोकवाङ्मयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण थाटात झाले.
चिपळूण : कोकणातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे लोकगीते आणि लोककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या पाच आणि उत्तेजनार्थ दहा लोककलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
चिपळूण : गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाचे जीवन समजून घेण्यासाठी स्वर्गीय श्रीराम दुर्गे सरांचा ‘गावभवरा’ हा कथासंग्रह आवर्जून वाचायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रेखा देशपांडे यांनी केले.
लांजा : वाचनसंस्कृतीपासून दूर चाललेल्या समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसापच्या माध्यमातून दूर करून प्रकाशवाटा दाखवायचे काम मसापने करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.