पुणे : जाहिरातींच्या छोट्या जिंगल्सपासून मालिकांच्या शीर्षकगीतांपर्यंत आणि भावगीते, भक्तिगीतांपासून चित्रपटांतील गाण्यांपर्यंत अशा संगीताच्या क्षेत्रात चौफेर आणि संस्मरणीय कामगिरी करणारे ज्येष्ठ संगीतकार म्हणजे अशोक पत्की. २५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा ८०वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने, तसेच, गणेशोत्सवाचे औचित्य साधून पुण्यातील ‘सुरभी’ या संस्थेने ‘सप्तसूर माझे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
