स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती यावेळी मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. राज्य शासनाने प्रथमच त्यासाठी पुढाकार घेतला. अलीकडे सामाजिक समरसता आणि हिंदुत्व याबाबत अत्यंत टोकाची मते तयार झाली आहेत. ही टोके विचारांनीच बोथट करता येऊ शकतील. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी सावरकरांचा उल्लेख शतपैलू सावरकर असा केला होता. त्यांच्या या सर्व पैलूंचे संशोधन आणि अभ्यास तसेच प्रामुख्याने त्यांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी सावरकर विद्यापीठ स्थापन व्हायला हवे.
