करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रावरही दुष्परिणाम झाला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर बसले आहेत, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान केले जात आहे, ही नेहमीची प्रक्रिया सुरू व्हायला आणखी किती काळ जाईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे साऱ्यांचेच लक्ष वळले आहे. शिक्षण विभागानेही आता त्याला मान्यता दिली आहे. त्याकरिता शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जण विविध उपक्रम राबवत आहेत. अनेक अॅप्स तयार केली जात आहेत; पण पंचायत समितीने पुढाकार घेऊन अॅप तयार करण्याचा पहिलाच प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समितीने राबविला आहे.
