रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपने नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला. ‘रस्त्यावरील खड्डे भरा, नाही तर खुर्च्या खाली करा, आठ दिवसांत सर्व रस्ते चकाचक करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू,’ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिला.
