कोकण रेल्वे मार्गावरील पहिली आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागली आहे. मडगाव–मुंबई या शुभारंभाच्या वंदे भारत एक्स्प्रेसला गोव्यातील मडगाव रेल्वेस्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून गाडीचा शुभारंभ केला. त्यानंतर विशेष निमंत्रितांना घेऊन गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. गाडीचे कणकवली आणि रत्नागिरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
