एसटीतून ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याची ही घोषणा होती. अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असल्यामुळे त्यावर टीका होण्याची शक्यता नाही, पण अशी लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षाही इतर अनेक बाबतीत सरकारने लक्ष द्यायला हवे होते.
