साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विजेत्यांच्या लेखांसह ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या अन्य निवडक लेखांचा समावेश असलेला साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दर्जेदार दिवाळी अंक सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होत आहे.
