मुंबई : हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील साईकला कला क्रीडा मंचाच्या बाकी शून्य नाटकाने प्रथम क्रमांकावर बाजी मारली. रत्नागिरीतील समर्थ रंगभूमीने सादर केलेल्या लिअरने जगावं की मरावं? या नाटकाला दुसरा क्रमांक जाहीर झाला आहे.
