वेरवली बुद्रुक गावात कुत्र्याला बिबट्याने पळवले

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक गावात काल (१५ सप्टेंबर २०२०) रात्री सरदेसाई यांच्या घराच्या आवारात शिरून कुत्र्याला पळवून नेले. बिबट्यानेच कुत्र्याला पळवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे स्पष्ट झाले. गेल्याच महिन्यात वेरवली बुद्रुक गावात एक बिबट्या मरून पडला होता. काल पुन्हा दुसऱ्या बिबट्याने कुत्र्याला पळवून नेल्याने गावात अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले असून भीतीचे वातावरण आहे.

वाचन चालू ठेवा

ओव्या, फुगड्यांच्या गाण्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी शकुंतला शिंदे यांचे निधन

रत्नागिरी : खोरनिनको (ता. लांजा) येथील जुन्या पिढीतील ओव्या, फुगड्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी श्रीमती शकुंतला दत्ताराम शिंदे (वय ७२ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींकडून मुख्यमंत्री निधीला साडेचौदा लाख

रत्नागिरी : करोनाच्या साथीमुळे सार्वजनिक कार्यक्रम होत नसले, तरी त्यासाठी केलेल्या तयारीला आणि उत्साहाला विधायक पर्याय शोधण्याचे प्रयत्न अधूनमधून होताना दिसतात. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही भपकेबाज कार्यक्रम न करता चौदा लाख एकतीस हजार रुपयांची रक्कम जमवून कोविड-१९चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री निधीला देऊन असेच उदाहरण घालून दिले आहे.

लांज्यातील दोन लहानग्यांना करोना; रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७

आज (ता. ११ मे) सायंकाळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांमध्ये पाच जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४७ झाली आहे. आज निश्चिती झालेल्या रुग्णांमध्ये लांजा तालुक्यातील नऊ आणि १० वर्षांच्या दोघा लहानग्यांचा समावेश आहे. लांजा तालुकाही आता करोनाबाधित तालुक्यांच्या यादीत आल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी आता केवळ राजापूर तालुका करोनामुक्त राहिला आहे.