ग्रामपंचायतीच्या निवडणुका निकोप वातावरणात व्हाव्यात, गावात सर्वच लोक एकमेकांना ओळखत असल्याने त्यांच्यामध्ये पक्षीय वाद निर्माण होऊ नयेत, गावाच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. तसे संकेत आहेत. पण निवडून आल्यानंतर सर्वच पक्ष आपल्या पक्षाच्या विजयाचा दावा करताना दिसतात. तसे होणार असेल, तर ते मूळ लोकशाही निकषांनाच बगल देणारे ठरते. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील उमेदवारांनाही यापुढे पक्षाची चिन्हेच द्यावीत, हे बरे.
