रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी यांनी आतापर्यंत असंख्य मत्स्योत्पादकांना मार्गदर्शन केले असून, त्यासाठी पुस्तकेही लिहिली आहेत. आता त्यांनी ‘मीठे जल में मछलीपालन’ हे समग्र माहिती देणारे हिंदी पुस्तक लिहिले असून, त्याचा उपयोग देशभरातील मत्स्योत्पादकांना होणार आहे.
