रत्नागिरीत ७ ऑक्टोबरपासून स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाला

रत्नागिरी : पावस (रत्नागिरी) येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे येथील वरच्या आळीतील अध्यात्म मंदिरात ७ ऑक्टोबरपासून स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाला होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कृषी उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर, बचत गटांच्या प्रवर्तक सौ. नेहा जोशी-करंदीकर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शीतल काळे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार देण्यात येणार आहे.

Continue reading

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे रत्नागिरीत मासिक प्रवचनमाला; ३०, ३१ जानेवारीला देवदत्त परुळेकरांचे प्रवचन

पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने मासिक व्याख्यान/प्रवचनमालेचा उपक्रम ३० जानेवारीपासून रत्नागिरीत सुरू होत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला दोन व्याख्याने किंवा प्रवचने आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील देवदत्त परुळेकर यांच्या प्रवचनांनी केला जाणार आहे.

Continue reading

सप्तसूर म्युझिकल्स अभंग स्पर्धा प्राथमिक फेरी – रत्नागिरीतून तन्वी मोरे, सिंधुदुर्गातून महेंद्र मराठे प्रथम

रत्नागिरी : पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि रत्नागिरीतील सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमत संजीवनी गाथा’ राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला.

Continue reading