मुंबई येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या संस्थेकडून आयुष डॉक्टरांसाठी कोविड-१९ संदर्भातील ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर्सनी ११ एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र तशी कल्पना त्यांना केवळ दोन दिवस आधी देण्यात आली आहे. खेड्यापाड्यांत काम करणाऱ्या डॉक्टर्सना कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न भेडसावतो. त्यातच प्रशिक्षण न घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
