अभ्यासासाठी डोंगरावर इंटरनेट शोधणाऱ्या स्वप्नालीची पीएमओकडून दखल; गावाला तातडीने कनेक्शन

कणकवली : केवळ इंटरनेट कनेक्शन नसल्याने डोंगरावर जाऊन अभ्यास करणाऱ्या स्वप्नाली सुतार (दारिस्ते, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) या विद्यार्थिनीचा वनवास संपला आहे. सह्याद्री वाहिनीवरून प्रसिद्ध झालेल्या स्वप्नालीच्या बातमीची दखल प्रधानमंत्री कार्यालयाने त्वरित घेतली आणि भारत नेट प्रकल्पांतर्गत स्वप्नालीच्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसांत इंटरनेट कनेक्शन जोडण्यात आले आहे.

Continue reading