Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत उत्कर्षम् स्नेहसंमेलन उत्साहात

Advertisements

रत्नागिरी : शिरगाव (रत्नागिरी) येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए, नर्सिंग व फॅशन डिझायनिंग कॉलेजमध्ये उत्कर्षम् या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहात सांगता झाली.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, स्वप्ने पाहा, ध्येय ठरवा, त्यासाठी कठोर मेहनत घ्या. कोणतीही गोष्ट मन लावून करा, संयम आणि विनयशीलता ठेवा, या पंचसूत्री आधारे विद्यार्थिनींनी यश मिळवावे.

संस्थेच्या पवार सभागृहात आज सकाळी कार्यक्रम झाला. या वेळी प्रकल्प सदस्य प्रसन्न दामले, शिरगावच्या सरपंच फरिदा काझी, सायबर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, बीसीएसच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, नर्सिंग कॉलेजच्या प्र. प्राचार्य अर्चना बाईत, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षकांचा सत्कार दामले यांच्या हस्ते करण्यात आला.स्मिता सुतार यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, दक्ष राहिले पाहिजे यासंदर्भात माहिती दिली. सायबर पोलिसांचे कार्य आणि सायबर क्राइमसंदर्भात महत्त्वाची माहिती देऊन सोशल मीडियाचा जपून वापर करण्याची माहिती समजावून सांगितली.

मिस उत्कर्षमचा सन्मान खुशी गोताड हिने पटकावला. तर हर्षिता शेट्ये हिला द्वितीय क्रमांक मिळाला. एसवायबीसीएच्या वर्गाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. या विद्यार्थिनींनी बक्षीस घेताना जल्लोष केला.उत्कर्षममध्ये क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. यात रस्सीखेच, डॉजबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, मेंदी, रांगोळी, वादविवाद, निबंध लेखन, पोस्टर मेकिंग, गुगल हंट, कोडिंग, फोटोग्राफी, फॅशन शो यांचा समावेश होता. प्रा. निमिषा शेट्ये यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version